आज खरे तर मी "तोडीतां फुलें मी सहज पाहिला जातां" या गाण्याविषयी लिहणार होतो. प्रभू रामचंद्रांना देखील आपल्या पत्नीचा हट्ट मोडता आला नाही. आपण बिचारे पामर, आपली काय बिशाद?
या विषयी लिहीत असताना आणि काहीतरी नवीनच सुचत गेले.

पाहता सहज मी ऍपल फोनची गाथा,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा
झळकती तयाची लखलखती स्क्रीन,
किती वेळ वापरून डोळ्यास न येई शीण,
सुमधुर वाजते imusic ची वीण,
वेडीच जाहले air चे वजन बघता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा
किती नवनवीन त्यातील रंग,
छायाचित्रे देती आधुनिक ढंग,
माझी रूपे बघून तुम्ही व्हाल त्यातच दंग,
कसला विचार करत बसता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा
बँकेत कोंडिले कष्टाचे जे धन,
या नवीन फोनवर जडले माझे मन,
मजसाठी करा इतका प्रण,
क्रेडिट कार्डच्या बिलाची कसली चिंता,
मज आणून द्या हो iphone १७ नाथा
नवीन फोन घेताच पाहतील नणंदा जावा,
वाटेल सहचर मैत्रिणींना माझा हेवा,
आला समीप दसरा, दिवाळी पाडवा,
त्यात माझा वाढदिवस कसा विसरता?
मज आणून द्या हो iphone १७ नाथा
विशेष सूचना - हे फक्त काल्पनिक विडंबन काव्य आहे. याचा कोणत्या घटनेशी साधर्म्य असेल तर योगायोग समजावा. :)
This poem is fictional. Any resemblance is purely coincidence.
-- अभिजीत जोशी,
२९ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment