Zurich Train Station |
मी नुकताच Rochers - de - Naye पर्यंत जाऊन आलो होतो..
Train Route for Rohers de Naye |
सकाळ पासून हिंडतो आहे..झुरिक वरून बर्न मार्गे जीनिव्हाला येत होतो..वाटेत १ सुंदर तलाव दिसला..
.Laussane, Vevey Nyon,Montreux आणि Geneva ही शहरे या तलावाच्या काठाशी आहेत..
सूर्य मावळतीला निघाला होता...रंगांची सुंदर उधळण सुरु होती...मी Laussane मध्ये तलावाच्या काठी बसलो होतो..मस्त कारंजे सुरु होते..मनात विचारांचे आणि बाहेर पाण्याचे...मी द्विधा मनस्थितीत होतो...एकाच वेळेला मला खूप आनंद होत होता आणि कुठेतरी खूप वाईट पण वाटत होते...माझ्याच मनाची समजूत काढत होतो मी..
कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
कधी आकाशाची निळाई,
कधी तीव्र उष्ण दाहकता,
कधी अल्लड, कधी अवखळ,
कधी नीरव, शुभ्र शांतता,
खदखदू नको, खळखळून वाहा,
साचू नको..प्रवाही राहा...
काळजीने वेढले, हळवे तुझे मन..
कुठे तरी चोर कप्प्यात, वेचलेले नाजूक क्षण...
आठवणींची ही शिदोरी,हळूच उलगडून पहा..
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
दु:ख एकटा झेलू शकतो..
सुख एकट्याला सोसवत नाही...
ध्यासपंथी पावलांना, सुख दु:ख सम राही..
स्थितप्रज्ञता प्रकाशते, वेध स्वप्नांचा लागता...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
Sandhiprakash...Lake de Geneve |
तुमचे अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील...:) :)
Dear Abhijeet
ReplyDeleteKhoopach chhan lihito re tu !
Mala kavita khoopach avadali mitra ,,,
Keep it up, ani kavitet lihilya pramane sachun rahu nakos , asach pravahi raha an amhala tyzya anakhi naveen kavita vachayla milu de ...
Keep it up, Abhijeet! Good work
ReplyDeleteKhoopach chhan Abhi Dada superb
ReplyDeleteअभिजीत खुपच छान लिहितोस. तुला आलेले अनुभव ऐकून छान वाटले..
ReplyDeleteअभिजीत खुपच छान लिहितोस. तुला आलेले अनुभव ऐकून छान वाटले..
ReplyDelete