करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे..!!
आदरणीय साने गुरुजींच्या या विचाराप्रमाणेच आपली शाळा, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ यांनी आपल्या सर्वांवर असेच उत्तम संस्कार केलेत. आज शाळेतून बाहेर पडून जवळपास २० वर्षे झाली असावीत. अजूनही सर्व आठवणी अगदी काल घडल्यासारख्या आठवतात. मी शाळेत ५ वीत प्रवेश घेतला. जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मधून साने गुरुजी विद्यालय. त्या वेळी खाजगी शाळांचें तसे आकर्षण नव्हते. नाही म्हणायला गावातील काही मुले इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी जयसिंगपूरला जायची. आजकाल तर पोर जन्माला यायच्या आधीच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक चिंतेत असतात. मग डोनेशनचे आकडे ऐकूनच भोवळ यायला लागते. असो. जास्त विषय नको वाढवायला.
शाळेच्या आठवणी मनात अगदी घर करून बसलेल्या. रोज सकाळी १०. १५ वाजता पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी या गणवेशात घरातून बाहेर निघायचे. शाळेत दप्तर ठेवले की प्रार्थनेसाठी मैदानावर. सुरुवात मैदानाची साफ सफाई करून व्हायची. मैदानावरचे खडे गोळा करून आपापल्या वर्गाप्रमाणे रांगेत उभे राहायचे. बोरगावे सरांच्या आवाजातील प्रार्थना. रोज वेगळी भाषा. खरा तो एकचि धर्म पासून चेलुवीन मुद्दीन मक्कडे, लहू का रंग एक है, देवा गजानना इत्यादी इत्यादी. सुविचार, महत्वाच्या बातम्या, प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत. शनिवारी तर पी.टी. चा विशेष तास. उशीर झाला की पाथरवट सर किंवा गायकवाड सर प्रवेशदारापाशी उभे असायचे. मैदानाला पळत पळत एक फेरी मारून मगच शाळेत प्रवेश मिळायचा. ९ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे विशेष दिवस. प्रभातफेरी. शाळेतील बँड पथकात वाजवलेली बासरी (फ्लूट), राष्ट्रगीताची धून, हम होंगे कामयाब आणि पी. टी. साथीच्या वेगवेगळ्या धून ढोलाच्या लयीत वाजवायला खूप छान वाटायचे. अजूनही कधी कधी छोट्या बासरीवर जन गण मन वाजवताना शाळेच्या आठवणी ताज्या होतात.
शाळेत शिकविलेल्या अनेक गोष्टी आजही आयुष्यात खूप उपयोगी पडत आहेत. श्रमदान, साफसफाई या केलेल्या कामांमुळे आजही कोणत्याही प्रकारच्या कामाला लाज वाटत नाही. कन्या शाळेचे मैदान स्वच्छता असो किंवा मुख्य इमारतीच्या मागे असलेली विहीर बुजवताना केलेले सांघिक कृत्य. (टीमवर्क). शिक्षणाने माणूस शहाणा होतो पण एक समजूतदार नागरिक (matured citizen) बनण्यासाठी सारासार विवेक बुद्धी तयार होणे हे देखील तितकेच महत्वाचे. ही मूल्ये शालेय वयातच अंगी बाणवायला लागतात आणि पुढील आयुष्यात त्याचा खूप उपयोग होतो. आम्ही खरेच भाग्यवान आहोत की ५ वी ते १० वी या कालावधीत हे संस्कार मिळाले.
सावगावे सर (गणित), पाटील(दिवटे) मॅडम (गणित, हिंदी, इतिहास), बागवान सर (हिंदी), पलंगे सर (इंग्रजी), गुदले सर (इंग्रजी), सुभेदार मॅडम(इतिहास, भूगोल), किरपेकर सर (मराठी) आणि मॅडम (हिंदी, संस्कृत), बी. जे. पाटील सर,खिलारे सर, सुतार सर (रसायन शास्त्र), कोल्हापुरे सर(इंग्रजी), चव्हाण सर(विज्ञान), बोरगावे सर (विज्ञान), दातार सर(भूमिती), विलास कांबळे सर(इंग्रजी), जयन्नावर सर(मराठी, इतिहास), निर्मळे मॅडम (हिंदी), ताटे सर (चित्रकला), कदम सर (गणित, भूमिती), पाथरवट सर, गायकवाड सर, बब्बर पाटील सर, तावदारे सर (शा. शि.), मोहिते सर, माळी सर (इंग्रजी), माळी सर (प्रयोगशाळा). अजूनही बरीच नावे आहेत. कुणाची नावे विसरली असल्यास क्षमस्व.
कामाच्या निमित्ताने बऱ्याच देशांत फिरण्याची संधी मिळाली. आजकाल प्रगत देशांमध्ये वही पुस्तकांच्या ऐवजी छोटा संगणक (टॅब्लेट) वर अभ्यासक्रम शिकवतात. दप्तर, वह्या, पुस्तके इत्यादी सर्व शाळेतच कपाटात ठेवतात. रोजचा गृहपाठ टॅब्लेट वरच करून तिथेच शिक्षकांना तपासण्यासाठी पाठवायचा. इतका तंत्रज्ञानाचा वापर होतोय. त्यामुळे नवीन नवीन प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. मुलांचा लक्ष देण्याचा कालावधी ५ ते ७ मिनिटांवर आलेला आहे. त्यामुळे शिक्षकांना देखील नवीन क्लुप्त्या लढवून मुलांना शिकवावे लागत आहे. प्रत्येक पालक सुखवस्तू असल्यामुळे कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही. तरीदेखील माध्यमिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये तणाव (स्ट्रेस) व नैराश्य (डिप्रेशन) वाढतंय. त्यातच प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी असल्यामुळे "गूगल हाच गुरु" खूपच लोकप्रिय आहे. इथून पुढचा काळ हा शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी बराच आव्हानात्मक असेल.
सुदैवाने आमच्या वेळी व्हाट्स ऍप, फेसबुक, गुगल नव्हते. माझी १९९८ ची तुकडी. (बॅच). शाळेने आमच्या वर्गातील प्रत्येकाला एक आत्मविश्वास मिळवून दिला. कितीही प्रतिकूल परिस्थिती असताना अजिबात हार नाही मानायची. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकविले. आज व्हाट्स ऍप च्या कट्ट्यावर बऱ्याच लोकांच्या संघर्ष गाथा वाचायला मिळत आहेत. आतापर्यंतच्या ४७ तुकड्यांमध्ये प्रत्येकाचीच काही ना काही एक विशेष कथा आहे. मला अभिमान आहे की विजय , निजाम यांची संघर्षगाथा विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. माझ्या वर्गातील सगळेच जण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात बरेच पुढे गेले आहेत याचा अभिमान आहे.
शाळेत असताना अभ्यासाबरोबरच इतरही व्यावहारिक कौशल्य (सॉफ्ट स्किल्स) शिकायला मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन, गणित प्रज्ञा, प्राविण्य परीक्षा, हिंदीच्या परीक्षा, सामान्य ज्ञान, हस्तलिखित , नाटक, पोवाडा, सूत्र संचालन इत्यादी.
मला वाटते शाळेच्या विविध गुणदर्शनाच्या वेळी आम्ही हस्त लिखिते बनवत असू आणि माझा वर्गमित्र डॉ. तमीरुद्दीन दानवाडे याने लिहिलेली "शून्याची गंमत" ही कविता अजूनही लक्षात आहे. शाळेत असताना वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यास करत असताना शिकलेली कौशल्ये आजही दैनंदिन कामकाजात उपयोगी पडतात.
आजकाल तंत्रज्ञानाने जग जवळ येत आहे. या सुवर्ण महोत्सवी मेळाव्याचेच उदाहरण घ्या. प्रत्येक जण व्हाट्सऍप वर आहे. गूगल वर आपण नोंदणी सुरु केली आहे. हे सगळे बघून खूप आनंद होतोय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण कुठेच मागे नाही आहोत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ आणि अंतराच्या व्यस्त प्रमाणामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याचे दु:ख आहे. पण तंत्रज्ञाच्या कारामतीमुळे दूरचित्रवाणी संभाषण (विडिओ कॉल) करून तुमच्या सोबत आभासी उपस्थिती नक्कीच असेन.
-- अभिजीत दिगंबर जोशी, १९९८ तुकडी.

Great,
ReplyDeleteFunny part is i have completely forgotten the poem, and I don't have any written document.