अजून कळत नाही मजसी, For Here OR To GO
दिवसांमागुनी दिवस चालले, उलटली दिनदर्शिकेची पाने,
ना भ्रमंतीचा मोह सुटेना, वा पैशाचा भ्रम तुटेना,
वाटेवरती सदैव दिसे, मृगजळाचा भासच हो,
अजून कळत नाही मजसी, For Here OR To GO…१
सहजपणाची अनुभूती येथे, भविष्याची भ्रांत नसे,
दुरदेशीचे अडसर सरले, गुणवत्तेला स्थान असे,
आरक्षणाचे बंध नसती, मुक्तपणाची जाणीव हो,
अजून कळत नाही मजसी, For Here OR To GO… २
नात्यांचे या काय करावे, विचारांचे वादळ यावे,
दुधावरच्या सायीसाठी, वृद्धत्वाने किती झुरावे?
या प्रश्नांचा उपाय सुचेना, चक्रव्युहात अडकलो हो,
अजून कळत नाही मजसी, For Here OR To GO …३
कर्तुत्वाची नवीन संधी, वा कर्तव्याचा वेध भला,
रोज मनातून ठिबकत राही, ओला थेंब डोळ्यांमधला,
सगे सोयरे सोबती सारे, भेटती आभासी पटलावरती हो,
अजून कळत नाही मजसी, For Here OR To GO …४
-- अभिजीत जोशी,
२४ जून २०१५

No comments:
Post a Comment