गीतरामायणातील आजचे गाणे हे चक्क एका राक्षसीवर लिहिलेले आहे. ताटिका नावाची ही राक्षसी. महर्षी विश्वामित्रांच्या तपश्चर्येत ती आणि तिचा मुलगा सदैव त्रास देत असतात. म्हणून राजा दशरथाला विनंती करून महर्षी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणासह त्यांच्या आश्रमाकडे जात असतात. वाटेत त्यांना ताटिका राक्षसी आडवी येते.
तिला बघून महर्षी प्रभू रामचंद्राना सांगतात, की हे धनुर्धारी, चाप बाण वापर आणि ताटिका राक्षसीचा वध करून तिच्या भीतीतून जनतेला मुक्त कर.
हे गाणे नाट्यशास्त्रातील वीर रसावर आधारित आहे. हे गाणे शौर्य, पराक्रम आणि वीरतेची भावना व्यक्त करते.
पहिल्याच कडव्यात काही शब्द जे सहसा मराठी भाषेत कमी वापरले जातात जसे की, कार्मुका - धनुष्य धारण करणारा, झणि - पटकन, सायक - बाण.
थबकसी कां असा? हाण रे बाण तो
तूंच मृत्यू हिचा, मी मनीं जाणतो
जो जनां सुखवितो
नारीवध क्षम्य तो
धर्म तुज सांगतो मानवेद्रा! ।।५।।
जोड झणिं कार्मुका
सोड रे सायका
मार ही ताटिका रामचंद्रा ।।१।।
दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या अंतऱ्यात राक्षसीचे वर्णन करताना गदिमांनी वापरलेले शब्द परिणामकारी आहेतच पण बाबूजींनी ते गाताना त्या शब्दांचे उच्चार देखील तितकेच स्पष्ट आणि गाण्याच्या वीर रसाला रसिकांपर्यंत पोचवणारे आहेत.
दुष्ट मायाविनी
शापिता यक्षिणी
वर्तनीं दर्शनीं ही अभद्रा ।।२।।
तप्त आरक्त हीं पाहतां लोचनें
करपल्या वल्लरी, करपलीं काननें
अनुलबलगर्विता
मूर्त ही क्रूरता
ये घृणा पाहतां क्रूर मुद्रा ।।३।।
ऐक तें हास्य तूं, दंत, दाढा पहा
मरुन हस्ती जणूं, भरुन गेली गुहा
मृत्यु-छाया जशी
येतसे ही तशी
ओढ दोरी कशी मोड तंद्रा ।।४।।
वरील अंतऱ्यात वापरलेला तंद्रा हा शब्द तंद्री किंवा गुंगी हा अर्थ दर्शवतो. महर्षी विश्वामित्र रामचंद्राला सांगत आहेत की या राक्षसीचा वध कर पण त्या काळातील युद्ध संकेतानुसार स्त्री वर हत्यार उचलणे हे वीरतेचे लक्षण नव्हते. इथे जसा महाभारतात अर्जुन "मम् सीदन्ति गात्राणि" म्हणत भांबावून गेला होता, तसेच प्रभू रामचंद्रांना देखील प्रश्न पडला होता. पण मग महर्षी विश्वामित्र सांगतात की जे राक्षस राज्यातील प्रजेला त्रास देतात त्यामध्ये राक्षसी देखील असली तरी तो वध राजाला किंवा वीराला क्षम्य असतो. त्याचेच वर्णन हे पाचव्या अंतऱ्यात केले आहे.

त्याच्या पुढील अंतऱ्यात याच्या आधी कोणी कोणी असे कार्य केले आहे त्याचेही वर्णन महर्षी विश्वामित्र करतात.
दैत्यकन्या पुरा, ग्रासुं पाहे धरा
देव देवेंद्रही, मारि तें मंथरा
विष्णू धर्मोदधी
शुक्रमाता वधी
स्त्री जरी पारधी, अरि मृगेंद्रा ।।६।।
शेवटच्या अंतऱ्यात, सगळी प्रजा तुझ्या धनुर्विद्येचे कौशल्य बघण्यास उत्सुक आहे, असे सांगत प्रभू रामचंद्रांना शौर्यचंद्र अशी उपमा देतात.
धांवली लाव घे, कोप अति पावली
धाड नरकीं तिला, चालल्या पावलीं
बघती तव विक्रमां
देव पुरुषोत्तमा
होऊं दे पौर्णिमा, शौर्यचंद्रा ।।७।।

ज्यांना हे मूळ गाणे ऐकायचे असेल त्याची लिंक इथे देतो आहे. वीर रसावर आधारित आणि शंकरा रागात स्वरबद्ध केलेले हे गाणे तुम्हाला देखील नक्की आवडेल.
मार ही ताटिका रामचंद्रा - https://www.youtube.com/watch?v=UOE17M6D2-U
-- अभिजीत जोशी,
३० सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment