You don't become what you think. You become what you do. Action is important to make dream come true. - Ancient Wisdom
मागच्या भागात लिहिल्या प्रमाणे मारिन कॉर्प स्पर्धेसाठी नोंदणी केली. ही स्पर्धा दरवर्षी वॉशिंग्टन डी सी मध्ये होते. हौश्या आणि नवशिक्या धावपटूसाठी, किंवा पहिल्यांदाच ज्यांना एवढे अंतर धावायचे असते त्यांच्यासाठी तशी सोपी असते. सोपी म्हणजे जास्त चढ-उतार नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये नोंदणी केली. समर्थ रामदास स्वामींचा एक सुंदर श्लोक आहे, "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे". आता विचारपूर्वक कृती करायची होती.
माझे प्रशिक्षक श्री. निलेश थरवळ यांनी जून २०२२ पासून धावण्याचे वेळापत्रक बनवले होते. त्याआधी मी मार्च २०२२ मध्ये मर्टल बीच हाफ मॅरेथॉन २ तास ३४ मिनिटात पूर्ण केली होती. हा संदर्भ(baseline) पकडून त्यांनी पूर्ण वेळापत्रक बनवले. आठवड्यात ४ वेळा धावायचे होते. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार. त्यातले मंगळवार आणि गुरुवार हे strides/speed workouts/low HR workout तर शनिवार long run साठी. रविवारी recovery run होता. हे वेगवेगळ्या प्रकारचे धावणे हा सरावाचा महत्वाचा भाग होता. एवढेच नव्हे तर उरलेल्या दिवसात म्हणजे बुधवार, शुक्रवार या दिवशी पोहणे, योगासने, वजन उचलणे, सायकल असे पूरक व्यायाम देखील अंतर्भूत होते. सोमवारी पूर्ण सुट्टी.
जून महिन्यात मी पहिल्यांदा नव्वदी पार केली (जून २०२२ - एकूण अंतर ९३.८ मैल). जुलै मध्ये डिस्नी वर्ल्ड बघायचा आधीच बेत आखला होता. त्यामुळे अपेक्षेएवढे अंतर धावता आले नाही. तरीही पुन्हा एकदा नव्वदी पार केली (जुलै २०२२ - ९१ मैल). माझा नव्वदीत बाद होणारा सचिन तेंडुलकर झाला होता. ऑगस्ट मध्ये १५ ऑगस्ट पर्यंत एकूण ५६ मैल अंतर धावलो. धावगती मार्गावर आली होती. पण अचानक आम्हा सर्वांना कोविड संसर्ग झाला. त्यानंतर पुढचे २ आठवडे खूपच अशक्तपणात गेले. धावण्याचे सगळे नियोजन कोलमडले होते. सरावातले सातत्य आता कुठे सुरु झाले होते आणि अचानक थांबले. मला एखादा मैल पळताना देखील धाप लागत होती. अगदी हळू हळू धावताना देखील प्रचंड दम लागत होता. कोविड नंतर अवसान गळाल्यासारखे झाले होते. त्यामुळे प्रशिक्षक, माझे इतर सहकारी यांच्याशी विचार मसलत करून पूर्ण मॅरेथॉन धावण्याचा बेत पुढे ढकलला. माझे प्रशिक्षक श्री. निलेश थरवळ यांनी जून २०२२ पासून धावण्याचे वेळापत्रक बनवले होते. त्याआधी मी मार्च २०२२ मध्ये मर्टल बीच हाफ मॅरेथॉन २ तास ३४ मिनिटात पूर्ण केली होती. हा संदर्भ(baseline) पकडून त्यांनी पूर्ण वेळापत्रक बनवले. आठवड्यात ४ वेळा धावायचे होते. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार. त्यातले मंगळवार आणि गुरुवार हे strides/speed workouts/low HR workout तर शनिवार long run साठी. रविवारी recovery run होता. हे वेगवेगळ्या प्रकारचे धावणे हा सरावाचा महत्वाचा भाग होता. एवढेच नव्हे तर उरलेल्या दिवसात म्हणजे बुधवार, शुक्रवार या दिवशी पोहणे, योगासने, वजन उचलणे, सायकल असे पूरक व्यायाम देखील अंतर्भूत होते. सोमवारी पूर्ण सुट्टी.
मला आता परत पहिल्या पासून सुरुवात करावी लागली. १ सप्टेंबर पासून परत धावायला सुरुवात केली. पहिला आठवडा अगदी कमी अंतर धावलो. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी अंतर धावणे जमले होते. आणि बघता बघता मी ३० सप्टेंबर मध्ये धावण्याचे शतक पूर्ण केले. (सप्टेंबर २०२२ - १०२ मैल). या महिन्यात खूप सातत्य होते. वेग अजूनही कमी होता पण धावण्याचे एकूण अंतर वाढले होते.
ऑक्टोबर मध्ये पुन्हा सातत्य होते. या महिन्यात मी १०७ मैल धावलो. आता दसरा आणि दिवाळीचे पदार्थ खाताना कॅलरी बघाव्या लागत नव्हत्या. नोव्हेंबर मध्ये आमच्या गावातली प्रसिद्ध सिटी ऑफ ओक हाफ मॅरेथॉन धावलो. या वेळी मला २ तास २६ मिनिटे लागली. हा माझा अर्ध मॅरेथॉन धावण्यातला नवीन विक्रम (New PR) होता.
एकंदरीतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये केलेल्या सरावाला चक्रवाढ सूत्राचा फायदा झाला. चक्रवाढ सूत्र (Compounding Principle) हे सगळ्याच बाबतीत लागू होते. मग ते गाणे असो, धावणे असो किंवा संपत्ती निर्माण असो.(Repeat and Compound) जेवढा शिस्तबद्ध सराव/रियाज तेवढी जास्त सहजता.
ऑक्टोबर २०२२ मधली मरीन कॉर्प पूर्ण मॅरेथॉन धावू शकलो नाही. आता मात्र मार्च २०२३ मधली टोबॅको ट्रेल मॅरेथॉन खुणावत होती. हाताशी साधारण २३ आठवडे होते. Thanksgiving च्या सुट्टी नंतर (२५ नोव्हेंबर नंतर) पुढचा सराव सुरु झाला. हा तसा कठीण काळ असतो. नोव्हेंबर ते मार्च इकडे बऱ्यापैकी थंडी असते. बर्फ जरी पडत नसला तरी बाहेर हाडे गोठविणारी थंडी असते. सर्वसाधारण तापमान हे उणे ७ अंश (19 Deg F) ते २अंश (36 Deg F) इतके असते. कडाक्याच्या थंडीत अंथरुणातून बाहेर पडावेसे वाटत नाही. आता तर मला पहाटे ५.३० वाजता उठून धावायचे होते. (क्रमश:)
No comments:
Post a Comment