आज विजयादशमी. नवीन सुरुवात करण्याचा दिवस. सीमोल्लंघन करण्याचा दिवस…बरेच लोक असेही म्हणतील की सत्याचा असत्यावर विजय किंवा दैवी शक्तींचा असुरी शक्तींवर विजय…मला या वादात पडायचे नाही…
मी तर म्हणेन की आजच्या दिवशीच नव्हे तर रोजच तुमच्या मनातील चांगल्या विचारांना नवीन दृष्टी मिळावी. तुमच्या ठरलेल्या चौकटीबाहेर जाऊन, मनातील भीती, दडपण यावर मात करून चौफेर सीमोल्लंघन करावे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
No comments:
Post a Comment