Friday, 30 January 2015

An evening in New York

न्युयाॅर्क मधील संध्याकाळ....
एक कप काॅफी अन् खुपशा गप्पा,
सकाळपासुन संध्याकाळचा संपतो तो टप्पा;
सुर्यास्ताची वेळ अन् रंगांची उधळण,
कामाचा शीण घालविणारे हे दोन क्षण।
संधिप्रकाशासोबत उजळणारे दिवे,
घराच्या वाटेकडे धावणारे थवे;
घड्याळाच्या काट्यावर घुसमटणारी गर्दी,
फ्लेक्सवर झगमगणारी निळीशार नदी;
प्रत्येकाच्या कानात इथे आवडीची गाणी,
आपल्याच विश्वात रमलेली उत्स्फुर्त तरूणाई;
व्यक्तिस्वातंत्र्याचा इथे परिपुर्ण पाठ,
न्युयाॅर्कच्या दिवसाचा वेगळाच थाट...!!

No comments:

Post a Comment