ना राहिली युती, ना झाली आघाडी,
नेत्यांच्या कळपात सुरु झाली कुरघोडी,
निवडणुकीच्या साठमारीत, दिसतोय सत्तेचा गोळा,
बोके सारे आले पळत, महाराष्ट्राकडे होतोय कानाडोळा…
जमीन मागतीये पाणी, अन नागरिक मागतोय काम,
कापूस मागतोय भाव, अन कांदा रडतोय राव
सत्तेच्या खेळत जरा द्या लक्ष इकडे,
दरवेळी नुसतीच देताय आश्वासने अन रुपये…
जनता झालीये आता शहाणी, नका सांगू जुनी कहाणी,
नको घराणे, नको तराणे, घडा फुटून सांडेल पाणी…
जो तो उठतोय, म्हणतोय मीच मुख्यमंत्री,
तुम्हा-आम्हा फक्त केळी अन संत्री.…
मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची,
कुणाला ना फिकीर, तुझ्या उत्कर्षाची…
- अभिजीत जोशी
२५ सप्टेंबर २०१४

No comments:
Post a Comment