Tuesday, 6 December 2011

वेळ जात नाही म्हणून...:):)

आयुष्यात काही प्रवास एकट्याचेच असतात
जन्माला येतो ते ही एकटे
काही नाती असतात सोबत
काही काल, काही दिवस अन काही वर्षे
प्रत्येकाच्या बरोबर असे
काही क्षण असतो आपण
स्वत: बरोबर मात्र शेवट पर्यंत सोबत 
काही प्रवासी येतात..काही जातात..
निसर्ग नियम कुणाला टळले आहेत?
भविष्याच्या चिंता करून केस मात्र गळाले आहेत..
कधी आनंदी, कधी दु:खी,
मीच शोधतो माणूस सुखी
स्वत: न पाहतो, दुनिया सारी,
प्रत्येकाची तऱ्हा न्यारी..
कधी होतो अर्जुन...युद्ध प्रसंगी गलितगात्र
कधी होतो कृष्ण, असतो निमित्तमात्र
सारेच हे मनाचे खेळ,
कधी न कळते का येती ही वेळ..
दिवस जातो कष्टापाठी,
रात्र उरते न सरण्यासाठी..
प्रवासी तसेच...
प्रवास मात्र स्वत:चा
शोध स्वत:ला तू..
ठाव घे मनाचा..
किती ही वर्षे गेली सरली,
कितीक आणि पुढे उरली..
गेली त्यांचा कशाला शोक,
उरली त्यांचा कसला सोस...
जप स्वत:ला, सांभाळ स्वत:ला..
आयुष्यात शब्द दिला त्या प्रत्येकाला...
जग असा आनंदी...जसा आज शेवटचा दिवस..
क्षणो क्षणी वेच तू आनंदाचे कण अन हसरे क्षण..
-- आभिजीत जोशी..४ डिसेंबर २०११
वेळ जात नाही म्हणून काही तरी लिहित बसलो होतो...तुम्हाला वाचून कंटाळा आला असेल तर जरूर कळवा..

No comments:

Post a Comment