Saturday, 19 November 2011

कशाला चिंता उद्याची

प्रत्येकाला भीती असते...उद्या काय होणार त्याची..
आजची रात्र संपूच नये...कशाला चिंता उद्याची...

मोहाचे ते नाजूक क्षण, वेळ का सरतो पटकन ?
का हे भास वेडे, जीव लावतात फुकाची...
आजची रात्र संपूच नये...कशाला चिंता उद्याची...

भविष्य कुणी बघितले आहे? चिंता करतो विश्वाची...

बघ आधी स्वत:कडे, ओढ अनामिक नात्याची...
आई बाबा तिकडे हळवे, दूर देशी मन हे बसले...
अधीर हा जीव, कडा ओलवी डोळ्यांची...
आजची रात्र संपूच नये...कशाला चिंता उद्याची...

तू तिथे मी, वाटे हे आभासी..

स्वप्न तुझे अन माझे, डाव मांडते क्षणांशी..
नात्यांची ही अधुरी हुरहूर...मनी विचारांचे काहूर
परमेश्वरा एक मागणे, शक्ती दे ते लढण्याशी,
आजची रात्र संपूच नये...कशाला चिंता उद्याची...

होईन मी यशस्वी, जीवनाचा मी तपस्वी,

सुंदर आयुष्याचा, खेळ मनस्वी,
मीच ठरवितो, कसे जगणे, कसे लढणे,
शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे,
मज न आवडे,रडणे अन हरणे,
हा विश्वास दिला तू, हा आधार दिला तू ,
जगवितो ही तू , आयुष्याच्या अंती ही तू,
मन माझे अफाट, जाणतो हे तूच...
परमेश्वरा, 

क्षणांचे हे गणित, नाळ बांधते जगण्याशी,
दिवस नवा रोज येउदे, माझी स्पर्धा माझ्याशी...

-- अभिजीत जोशी १३/११/२०११
" A beautiful relationship not only depend on how well we understand some one, it also depends upon how well we avoid misunderstanding.. :):)"

तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडतील...नक्की कळवा... :):)

No comments:

Post a Comment