Monday, 26 December 2011

Grüezi...!!!



Grüezi...
दचकू नका.....तुमचे स्विस मध्ये स्वागत आहे...या वर्षी परदेश संधी स्विस च्या रूपाने मिळाली...झुरिक च्या विमानतळावर उतरताना स्वागतिकेने या लडिवाळ स्विस जर्मन मध्ये स्वागत केले...विमानातून बाहेर येताच एकदम थंडी जाणवली...हळू हळू रांगेतून पुढे जाऊ लागलो...परराष्ट्र कार्यालयाच्या तपासनीसाने सगळी कागदपत्रे मागितली...सगळे काही ठीक आहे हे बघून झाल्यावर तो पण Grüezi म्हणाला..त्या वेळी काही कळले नाही..पण असे वाटले कि राम राम पाव्हणे...आपल्या बोलीभाषेत तो म्हणत होता...तपासणी पूर्ण होताच रांगेतल्या मुंगीच्या नियमाप्रमाणे पुढे जात राहिलो..एकदम रेल्वे स्टेशन वर आल्यासारखे वाटले...तिथे विचारपूस केली तेव्हा कळाले..हे रेल्वे स्टेशन नसून विमानतळावरून बाहेर जाण्यासाठी जाणारी स्वयंचलित वाहन (automated tram) आहे..परदेशी असे छान प्रकार बघायला मिळतात...एवढ्या मोठ्या विमानतळाच्या पोटात एक छोटीशी गाडी असते..आणि काहीही कळायच्या आत ती तुम्हाला अलगद बाहेर आणून सोडते...या गाडीच्या दोन्ही बाजूला स्विस गायी, चोकोलेत्स आणि नयनरम्य चित्रे सोबत असतात..काही क्षणातच मी विमानतळाच्या बाहेर आलो..माझे प्रवासाचे सामान देखील बाहेर पोचले होते..मजा आली... :):)

बाहेर येताच प्रवीण ने दिलेल्या सीम कार्ड वरून अमित ला फोन करू लागलो..तेवढ्यात तो आलाच होता...मग गप्पा मारल्या आणि टेक्सी मध्ये बसून बाहेर बघू लागलो..स्विस विमान सकाळी ६.३० वाजता पोचले होते..बाहेर पडायला ७.३० वाजले..झुरिक शहर सकाळी जागे होऊन आपापल्या कामाला लागले होते...विमानतळावरच दुध, ब्रेंड अशी पोटपूजेची साधने घेतली होती...गाडीतल्या स्वयंचलित रस्ते मार्गदर्शकाने माझ्या चक्रधराला बरोबर रस्ता दाखवला आणि मी अगदी नीट घरी पोचलो...
Service Apartment... अर्थात स्वत:ची सोय स्वत: करणे या उद्देशाने बनविलेली जागा..सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या...काही क्षण विश्रांती घेऊन कामाला लागलो..सगळ्यात आधी चहा करून घेतला..थोडे बरे वाटले..आजपासून नवीन शिक्षण सुरु होणार होते..पहिल्यांदाच स्वयंपाक घरात प्रवेश करत होतो..आता रोज स्वत: जेवण बनवून खावे लागणार आहे..या विचारानेच थोडी भीती वाटली...पण घाबरायचे काय...चुकत चुकत शिकशील असे स्वत:ला बजावले आणि श्रीगणेशा केला...:):) नंतर खूप सारे प्रयोग केले...ते पुढील भागांमध्ये...या लेखात मला उपयोगी पडलेल्या काही आंतरजालीय माहितीच्या खाणाखुणा तुम्हाला सांगत आहे...तुम्हाला पण काही माहिती असेल तर जरूर कळवा..

१) नोंदणी -
इकडे प्रत्येक पर राष्ट्रीय नागरिकाला नोंदणी सक्तीची आहे.तुम्ही L कार्ड वर आला असाल तर..भटकंती साठी आला असाल तर Tourist Visa लागतो ..इथे या नोंदणी कार्यालयाला Kreisburo म्हणतात... आपल्याकडे कशी महानगरपालिकेची विभागीय कार्यालये असतात तसाच प्रकार...प्रत्येक नागरिकाला नोंदणी केल्याशिवाय बँक, रेल्वे पास व इतर कोणत्याही ठिकाणी खाते सुरु करता येत नाही...नोंदणी झाल्यानंतर साधारण एक आठवड्याच्या आत biometric नोंदणी करावी लागते..त्यानंतर तुम्हाला नागरिक ओळखपत्र (Permit) मिळते..त्याची अधिक माहिती http://www.stadt-zuerich.ch/ इथे मिळेल...अर्थात इंग्रजी भाषा निवडल्यावर सर्व माहिती इंग्रजीमधून दिसेल..
२) सार्वजनिक वाहन व्यवस्था...

www.sbb.ch
सर्वच युरोपिअन देशांमध्ये मला सार्वजनिक वाहन व्यवस्था खूप प्रगत वाटली...झुरिक मध्ये तर तुम्हाला दिवसाच्या एकाच तिकिटावर २४ तास कुठेही कधीही आणि कितीही वेळा त्या भागात प्रवास करू शकता...कुठल्याही सार्वजनिक वाहनाने...त्यामध्ये बस, बोट, ट्राम आणि रेल्वे हे सगळे प्रकार समाविष्ट आहेत...तुम्हाला इथे वार्षिक सवलत पास, मासिक सवलत पास आणि अर्ध्या तिकिटाचा पास असे खूप सारे प्रकार बघायला मिळतात..शिवाय वेळोवेळी यांच्या वेगवेगळ्या सुविधा यांची माहिती देखील मिळते...रेल्वेच्याच नव्हे तर इतरही संलग्न वाहतूक व्यवस्थेची पुरेपूर माहिती इथे मिळते...
यांचा इकडचा एक नियम आहे..६ मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही कुठेही थांबू शकणार नाही इतकी विचारपूर्वक ही प्रणाली बनविली गेली आहे... :):)
३) भटकंती

www.myswitzerland.com
ज्या लोकांना भटकंतीची आवड आहे त्या सर्वांसाठी खूप मस्त माहितीपूर्ण असलेले सांकेतिक स्थळ...स्विस मध्ये प्रामुख्याने प्रांतवार भाषा विभाग आहेत..दक्षिण दिशेला..म्हणजेच जिनिव्हा, वेह्वे..या भागात फ्रेंच भाषा आहे...पश्चिम आणि उत्तर दिशेला जर्मन भाषा बोलली जाते आणि प्रामुख्याने लुगानो आणि लोकार्नो या भागात इटालियन भाषेचे प्रामुख्या आहे...अगदी महाराष्ट्र सारखेच बोलीभाषेचे प्रकार इथे आढळतात...कोल्हापूरची रांगडी मराठी, पुण्याची वरणभात मराठी...इथे भाषेच्या या प्रकरण dilect म्हणतात..प्रत्येक भागाच्या वैशिष्ट्याप्रमाणे... :) खाली दिलेली सांकेतिक स्थळे तुम्हाला त्या त्या भागाची माहिती देतील...
http://www.andermatt.ch/de/sledging-m472/
http://www.berninfo.com
http://www.zoo.ch/
http://www.verkehrshaus.ch/
www.titlis.ch
www.engelberg.ch
www.saas-fee.ch
www.zermatt.ch
http://www.ascona-locarno.com
ज्या लोकांना साहसी खेळ प्रकार करायचे आहेत त्या लोकांसाठी www.trekking.ch ही खूपच मस्त आहे...
३) नैमित्तिक पोटपूजा..
इथे रोजच्या सामानासाठी Migros, Coop, Denner आणि Aldi सारखी दुकाने आहेत...त्यांचे प्रत्येक प्रभागात मोठी मोठी दुकाने आहेत..विविध प्रकारचे किराणामालाचे सामान इथे मिळते..एकाच छताखाली सगळ्या प्रकारची दुकाने असतात.. 
migros.ch
coop.ch
denner.ch
aldi.ch 
भारतीय खाद्य पदार्थांची दुकाने - अगरवाल, बरकत,फूड & नेट, इत्यादी इत्यादी...
४) दूरसंचार -
इथे Sunrise, Orange आणि Swisscom सारख्या दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या आहेत...प्रत्येकाचे दर आणि सुविधा वेगवेगळ्या आहेत...
sunrise.ch, orange.ch, swisscom.ch
भारतात फोन करण्यासाठी इथे teleline flat  सारखे कार्ड खूप उपयोगी पडते..त्याच बरोबर voip (आंतरजालीय दूरसंचार सेवा) सुविधा देणारे देखील प्रकार आहेत..action voip, Jumblo Voip इत्यादी विशेष लोकप्रिय आहेत...skype आणि  apple facetime शिवाय परदेशी राहणे शक्य नाही...आपल्या जवळच्या लोकांशी प्रत्यक्ष दृक्श्राव्य (audio - visual) माध्यामतून बोलणे म्हणजे पर्वणीच..
facebook,gmail शिवाय रोजचा दिवस सुरु होत नाही...हल्ली बऱ्याच वर्तमानपत्रांचे आंतरजालीय आवृत्ती असतेच..त्यामुळे भारताबाहेर राहतो आहे असे वाटत नाही...
५) सण संमेलने..
इथे बऱ्याच बहुभाषिक संस्था आहेत...marathimandalswitzerland (MMS) हे इकडील महाराष्ट्र मंडळ बरेचसे सांस्कृतिक सण साजरे करते...गणपती, दिवाळी, संक्रांत इत्यादी सण अतिशय सुंदर रीतीने साजरे केले जातात..englishforum.ch वर बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते..
६) शाळा व इतर शिक्षण -
इथे प्रामुख्याने जर्मन भाषेत शिक्षण आहे...१ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण सरकारी शाळांमध्ये मोफत आहे..मात्र आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये साधारणपणे ३०,००० स्विस फ्रांक (frank) वार्षिक फी आकारली जाते...शाळेच्या सुविधा अतिशय सुंदर आहेत...तसेच ज्या लोकांना जर्मन भाषा शिकायची आहे त्यांच्या साठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत...
७) जाता जाता....
बाकीची माहिती पुढील लेखात देईनच..ती देखील छायाचित्रांसह...असेच वाचत राहा...तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा... :):)..
Guten Tag....sie sehen... :):)


3 comments:

  1. Nice. Keep it coming. A message that you must give is that the Swiss generally have a very high quality life compared to their neighbors or even for that matter the United States - and that is largely driven by pragmatism, paying attention to detail and having a very positive outlook for life and most importantly
    - being proud of their culture and values!
    Also it is unfair to call the Swiss "Saheb" - that was the reserve of the British!

    ReplyDelete
  2. hi..Thanks a lot for your comment..Actually Last year when I was at UK, at that time I started my blog..so the heading was like that..Sahebachya Deshat...Now I think I can change heading.. :):) Thanks a lot for your comment and suggestion..Keep reading.. :):)

    ReplyDelete
  3. खूपच छान!! अभि...मस्तच फार आवडला..;)
    Ashish Gunjal

    ReplyDelete