Saturday, 31 December 2011

नवे वर्ष...नवे संकल्प...

नवे वर्ष...नवे संकल्प...
तुम्हा सर्वांची स्वप्ने या वर्षी पूर्ण होवोत...
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!
-------------------------------------------------------------------------------------
मला नवीन वर्षात काय काय करायचे आहे....

वजनाचा काटा..उभा राहून वाकला...
या वर्षी जमले तर वजन कमी करायचे आहे...
दमून भागून, किंवा डायेट करून..शरीर सुदृढ करायचे आहे..

मागच्या वर्षीची रोजनिशी...अर्धी रिकामीच आहे..
जमली तर ती देखील रोज लिहायची आहे...
रोजचे अनुभवांची बेरीज करून...नवे काहीतरी द्यायचे आहे...


इतके दिवस स्वत:च्या डोळ्यात अश्रू बघत होतो..
या वर्षी..स्वत: बरोबर..दुसऱ्याचे डोळे पुसायचे आहेत..
एकमेकांना आधार देऊन ..पुढे जायचे आहे..

निवडणूक इतके दिवस सुट्टीचा दिवस म्हणून बघत होतो..
लोकपाल साठी भांडणे बघून..निदान पुढच्या वेळी तरी चांगले लोक येतील,
यावर्षी देशासाठी, अन स्वत:साठी , मतदान करायचे आहे...

सरत्या वर्षात खूप साऱ्या चुका केल्या..
चुकांचे नवे अनुभव...सगळ्यांना सांगायचे आहेत..
या वर्षी त्या टाळून नवीन चुका करायच्या आहेत...

दर वर्षी नवीन स्वप्ने बघतो..काही पूर्ण करतो..काही अपूर्ण राहतात..
राहिलेल्या स्वप्नांना या वर्षी पूर्ण करायचे आहे...
नवी स्वप्ने डोळ्यात घेऊन....
-------------------------------------------------- अभिजीत जोशी..३१ डिसेंबर २०११

No comments:

Post a Comment