बोलता बोलता खूप बोलूनही ,
ती मनातील बोललीच नाही…
संवादाच्या बंधनातून ना उमगले,
वेळ कधी सरलीच नाही…
सैरभैर वारा अन मेघ दाटलेले,
रात्र समयी घर माझे गोठलेले,
विजांचा लखलखाट झाकोळ, घन बरसलाच नाही…
वाटले असे मला की, ती मनातील बोललीच नाही….
स्वप्न मनांचे, दोन जीवांचे,
दूर देशी वसे, मैत्र संचिताचे,
परस्परांच्या भेटीचा, क्षण अबोल मोहरून जाई..
वाटले असे मला की, ती मनातील बोललीच नाही….
क्षण तो होता नवथर…स्वर थरथरला, झाला कातर…
हृदय अचल, शब्द ओठावर, मनाशी मनाला हितगुज साधी…
वाटले असे मला की, ती मनातील बोललीच नाही….
मौनाची ती भाषा अलवर,
शब्दाविण संवादांना, नजरेने द्यावे उत्तर..
स्पंदनांची गाज, मन उधाण…
समय अनावर सये…बंध न उरणार काही..

No comments:
Post a Comment