गप्पा सुरु होतात आणि मग २ मिनिटांचे संभाषण तासावर जाऊन पोचते..
वेळ, काळ, देश... कशा कशाचे भान उरत नाही...कधी फोन, कधी गुगल....गप्पा सुरूच राहतात...
कधी भांडी करपतात,कधी रस्ता चुकतो, कधी बोलता बोलता फोन बंद पडतो, कधी रडका आणि नकोसा वाटणारा पाऊस देखील कुणाला चक्क आवडू लागतो अन कितीही हुशार असणारा माणूस देखील भलत्याच चुका करू लागतो...
कधी तरी वाटते...पुढे काय? पण त्या दोघांना पुढची पर्वा नसते..आहे त्या परिस्थितीत त्यांना आनंद वाटू लागतो..
एकमेकांना कितीही टाळायचे म्हणले तरी मन मात्र भलतीकडेच ओढत नेते...आणि एक दिवस कट्ट्यावरची अनुपस्थिती देखील काळजीत टाकून जाते...
ही सवय पण खूप वाईट गोष्ट असते...रोज एकदा तरी भेटल्याशिवाय, गप्पा मारल्याशिवाय चैनच पडत नाही...
दोघांना देखील एकमेकांच्या आयुष्यात खूप रस वाटू लागतो ...
मग एकाचा प्रश्न दोघांचा होतो आणि दोघे मिळून उत्तरे शोधू लागतात...
मग एकाचा प्रश्न दोघांचा होतो आणि दोघे मिळून उत्तरे शोधू लागतात...
आज काय, उद्या काय आणि परवा काय...एकमेकांचा दिवस देखील दोघांचा होतो...अन आयुष्यात कधीही न विसरता येणारे क्षण देऊन जातो...
सोनेरी दिवस, सोनेरी क्षण हेच तर असतात... ना भविष्याची चिंता, ना भूतकाळाचा खेद...
एकमेकांच्या आवडी निवडी...वाटणारी काळजी आणि खूप सारी मस्करी...त्या चिडण्या-चिडवण्यात पण खूप बरे वाटत असते...दोघानाही...
दोघेही एकमेकांना आवडत असतात...एकमेकांना miss करत असतात...पण खरे बोलत कुणीच नाही...Flirting करताना पण आतून वाटत असते..आता बोलेल..मग बोलेल..पण अचानक वेगळाच मुद्दा समोर येतो.....आणि परत बुद्धिबळाचा डाव पहिल्या घरापासून सुरु होतो....
न्यूटनच्या भौतिक शास्त्राचे सारे नियम इथे पण लागू होतात...
दोन विरुद्ध ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात....(Two opposite poles attract to each other) आणि प्रत्येक सादेला तेवढाच किंबहुना त्याहूनही जास्त प्रतिसाद मिळतो ( To every action, there is an equal and opposite reaction)...
मला हे दोघे पण वेगळेच वाटतात....थोडेसे हटके...कधी भांडतात...कधी थट्टा करतात..कधी एकमेकांना खूप भावूक पण करतात...या दोघांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे ते देवालाच माहिती...
स्वत:च्या भावनांशी प्रामाणिक आहेत हे दोघे...आणि आपल्या आई वडिलांशी देखील तेवढेच...दोघांचे प्रश्न सारखे...परिस्थिती सारखी...आणि काही प्रमाणात उत्तरे देखील....
एक मात्र नक्की आहे...जरी एकमेकांच्या आयुष्यात येता नाही आले...तरी देखील दोघे पण दु:खी नाही होणार...त्या दोघांना पण माहिती आहे...माझ्या आयुष्यात ही व्यक्ती जरी नाही आली तरी यापेक्षा कुणीतरी नक्कीच चांगली भेटेल.. :)
कारण दोघेही वर्तमानकाळात जगण्याचा पुरेपूर अनुभव घेत आहेत.... :):)
हेच तर आयुष्यभर सुखी राहण्याचे गुपित आहे...
हेच तर आयुष्यभर सुखी राहण्याचे गुपित आहे...
No comments:
Post a Comment