Monday, 20 June 2011

टेनिस पंढरी - विम्बल्डन




२६ जून २०१० हा दिवस माझ्या साठी रोजच्या प्रमाणे उजाडला...खूप दिवसांपासून म्हणजे अगदी लहानपणापासून जून महिन्यात टेनिस चे सामने दूरदर्शन वर प्रसारित व्हायचे. त्यात विम्बल्डन च्या Quarter Final, Semi Final and Final यांचा समावेश असायचा.
बोरिस बेकर, पीट साम्प्रास, आंद्रे आगासी, स्टेफी ग्राफ, मोनिका लेवेस यांचे सामने बघताना भान हरपून जायचे. टेनिसचा हा इंग्लंड मधील प्रकार म्हणजे मेजवानी असायची. त्या वेळी..म्हणजे साधारण १९९० ते १९९८ दरवर्षी हे सामने न चुकता बघायचो. त्यावेळी कधी वाटले नव्हते की प्रत्यक्षात कधी विम्बल्डन stadium मध्ये जाऊन बघता येईल का? पण स्वप्न नक्कीच होते.
सुदैवाने मी यावर्षी या स्पर्धेच्या वेळेला इंग्लंड मध्ये आलो होतो आणि ठरवले की ही संधी नाही सोडायची. विम्बल्डनचे तिकीट मिळणे हे देखील खूप जिकीरीचे काम आहे. Public Ballot मध्ये २ ते ३ वर्षे आधी नंबर लावला तर पूर्ण स्पर्धेचे तिकीट मिळण्याचे चान्सेस असतात. एवढे सर्व असूनही एकदा तरी बघून यावे अशी तीव्र इच्छा होती. हल्ली वेब साईट वरून तिकीट मिळू शकते...www.wimbledon.com

याच विचाराने मी सकाळी ७ वाजता Manchester वरून प्रवास सुरु केला. Virgin ट्रेन्स ने लंडनला प्रयाण केले. 

पहिल्यांदाच लंडन सारख्या ठिकाणी चाललो होतो. सकाळी ७.३० ची ट्रेन १०.२० ला लंडन Euston स्टेशनला पोहोचली. लगेचच लंडन ट्यूबचे तिकीट काढले. 

या भुयारी रेल्वेचा प्रवास पण पहिल्यांदाच. भीती होती थोडीशी. East Bound/ West Bound/ South Bound आणि North Bound platform. या स्पर्धेला गेल्या १२५ वर्षांचा इतिहास आहे.
डिस्ट्रीक्‍ट लाईनवरील विंबल्डनची ट्युब ट्रेन पकडून साऊथफील्ड या स्टेशनवर उतरलो. पूर्ण स्टेशन एखाद्या टेनिस कोर्टसारखे रंगविले होते.

स्टेशन वर सूचना सुरु होत्या...गर्दी खूप आहे...ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांनी कृपया स्टेडीयम मध्ये जाऊ नये.. पण मला तर वेड लावले होते...इथे पर्यंत आलो आहे आणि आत नाही जायचे म्हणजे काय?
मी आपला सरळ स्टेशनचा जिना चढून वर आलो व उजव्या दिशेला सरळ चालायला लागलो. सगळी गर्दी तिथेच चालली होती. साऊथफील्ड स्टेशनपासून चालत 15 मिनिटांवर टेनिसची पंढरी म्हणजेच जिथे विंबल्डन स्पर्धा भरतात, ती जागा आहे.
शेजारीच भले मोठे गोल्फ मैदान आहे. तिथे चौकशी केल्यावर कळले कि ज्यांच्याकडे तिकीट नाही आहे त्यांना रांगेत उभा राहावे लागेल...भली मोठी रांग होती..
 रांगेच्या शेवटी टेनिस चेंडूची खुण होती.. तिथे जाऊन उभा राहिलो..किती वाजेपर्यंत नंबर येईल असे विचारले..घड्याळ ११.३० ची वेळ दाखवत होते.

स्वयंसेवक म्हणाला तरी सायंकाळचे ५ वाजतील..मी थक्क होऊन बघत राहिलो..आता माघार नाही...काय वाटेल ते झाले तरी आज आत जायचेच या निर्धाराने तसाच उभा राहिलो..
रांग गोगलगायीच्या गतीने पुढे सरकत होती..मला या लोकांचे खरेच कौतुक वाटते...एवढी गर्दी असून देखील कुठेही गोंधळ, दंगा, धक्का बुक्की नव्हती...आजू बाजूला खाण्याचे नियंत्रित दुकाने, स्वच्छता गृहे, पाण्याची सोय...इत्यादी सर्व गोष्टी होत्या...त्या मुळे रांगेत राहूनही काही त्रास नाही झाला...

घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवून होतो...१२.३०, १.३०,२.३०, ३.३० वाजले तरी रांग हळू हळू पुढे सरकत होती..तिथेच मला नीरज भेटला..तो पण माझ्या सारखाच एकटाच आला होता..आमच्या गप्पांना मग चांगलाच जोर आला..भारताच्या राजकारणापासून, क्रिकेट आणि इतर बरेचसे विषय पार रवंथ होई पर्यंत चघळून  झाले...

४.३० वाजता मुख्य प्रवेश द्वार जवळ दिसू लागल्यावर जरा हुरूप आला...शेवटी आम्ही १४ पौंड चे तिकीट काढून आत गेलो...4 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील विंबल्डन ही मानाची स्पर्धा आहे

आम्ही आत पोहोचलो तेव्हा घड्याळ ५.१५ वेळ दाखवत होते..रोलेक्स ही घड्याळ उत्पादन करणारी कंपनी गेली अनेक वर्षे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत...आतमध्ये जागोजागी याच कंपनीची वेगवेगळी घड्याळे दृष्टीस पडतात...

आत गेल्यावर दुतर्फा भरपूर कोर्टस आहेत. काहींना भरपूर प्रेक्षकांना बसायची सोय आहे, तर काहींना फारच कमी प्रेक्षक बसतील अशी सोय होती. सगळ्यात प्रेक्षणीय कोर्ट म्हणजे 1, 2 व सेंटर कोर्ट.

एक मोठा स्कोअरबोर्ड दाराच्या प्रवेशद्वाराशी असतोच. त्याच्यावर सर्व निकाल व पुढे होणाऱ्या मॅचेसचे ड्रॉ ही आखलेले असतात.

या सर्व कोर्टच्या बरोबरीने एक हिरवीगार, गवताची टेकडी आहे.. लॉन म्हणा हवंतर.  ह्या टेकडीवर एक भलीमोठी स्क्रीन लावली आहे.
ज्याच्यावर सर्व मॅचेसचे स्कोअर कळतात व एखादी मॅच पहायलाही मिळते. बर्गर, सॅंडविचचा आस्वाद घेत, गवतावर झोपून मॅच बघण्याची मजाच काही और असते.
 आम्ही तसेच पुढे पुढे जाऊ लागलो...तेवढ्यात १७ नंबर कोर्ट दिसले..त्या कोर्ट वर आतापर्यंतचा सगळ्यात जास्त वेळ खेळला गेलेला सामना कालच झाला होता...एके ठिकाणी सानिया मिर्झाचा सामना सुरु होणार होता..तिच्या लग्नानंतर तिला अखंड हिंदुस्तानच काय पण पाकिस्तान आणि बांगलादेशातील प्रेक्षकांचा पाठींबा होता...पण किती जरी झाले तरी आपल्या कडील खेळाडूंचा stamina कमी पडतो असे जाणवले..
मला सेंटर कोर्ट मध्ये जाऊन सामना बघायचा होता..त्याचे तिकीट आम्हाला री सेल मध्ये मिळाले..आणि आम्ही तिकडे गेलो...सेंटर कोर्ट म्हणजे मेरुमणी..
Strawberry आणि Cream हे विम्बल्डन चे अधिकृत खाद्य आहे...प्रत्येक वर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल याच्या विक्रीतून होते..


विम्बल्डन...तिथली सभ्यता, चांगला गेम झाला की एका लयीत वाजणाऱ्या टाळ्या, अत्यंत शिस्त बद्ध वागणे, इंग्लंडच्या राणीचे आगमन झाले की रॉयल बॉक्स मध्ये होणारी लगबग, प्रत्येक विश्रांती च्या वेळेला होणारी कुजबुज चांगलीच लक्षात होती.
रेषेच्या थोड्या बाजूला जरी बॉल पडला की Foul असे ओरडणारा Match रेफ्री, खेळाडूने सर्विस साठी बॉल मागितले की १८० डिग्रीच्या कोनात हात वर करून बॉल देणारे लाईनमन...सगळच प्रेक्षणीय. 

गोरान इवानसेवीच आणि पीट साम्प्रास यांच्या मध्ये चालणाऱ्या ACE चे युद्ध, प्रत्येक गुण मिळविण्यासाठी केलेली जीवापासून धडपड, न दमता सलग ४-५ तास टेनिस खेळणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
विम्बल्डनचे थेट प्रक्षेपण इथे असणाऱ्या या studio मधून  जगभरातील प्रेक्षक याचा आनंद घेत असतात..
तो सामना झाल्यानंतर आम्ही इकडे तिकडे हिंडत होतो...आणि समोर सचिन तेंडूलकर दिसला...सोबत ब्रायन लारा पण होता...त्या दोघांना खास आमंत्रण होते...

आम्हा वारकरी लोकांना प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन....सगळे भारतीय लोक सर्व काही विसरून सचिन सचिन असे जोरात ओरडू लागलो...खरे तर आम्ही जवळ पास ५.३० तास रांगेत उभे होतो...हे सर्व एका क्षणात विसरून गेलो...अगदी भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर आणि काय पाहिजे....आमचा दिवस सार्थक नव्हे तर अतिशय भाग्याचा होता.. विम्बल्डनचे स्वप्न पूर्ण झाले होते...आणि त्यावर कळस देवाच्या दर्शनाने सध्या झाला होता..भगवान देता है तो छप्पर फाडके..अशीच आमची अवस्था झाली होती...

सचिन च्या या दर्शनावर पुढच्या blog मध्ये..तोपर्यंत आपण सर्वजण या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेचा आनंद घेऊ...
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडतील... :) फोटो सहकार्य - नीरज चौधरी..

No comments:

Post a Comment