कौलारू शाळेतील पहिला दिवस असाच असायचा...शाळा ७ जून ला सुरु व्हायची...मृग नक्षत्रावर पाउस तुफान बरसायचा....त्या शाळेतील मज्जा वेगळीच...!!
नवीन दप्तर, नवीन वही,
नवीन पुस्तक, एकदम सहीS
नवीन वस्तू, नवीन कंपास,
डोळे मिटून घेतलेला, कोऱ्या कागदाचा वास...
नवीन गणवेश, जुनेच मित्र,
परत भेटताना, पुन्हा नवीन सत्र.
पहिल्या पावसाचे थेंब,
कौलारू छपराचा धुंद गंध,
घट्ट आवळून घेतलेले,
दप्तराचे बंध....
जुन्या आठवणी आहेत खूप खास,
हेडमास्तरांचा पहिला तास,
मन जाते हळूच बालपणात परत,
अजूनही लक्षात आहे, शाळेचा पहिला दिवस...!!!
------ missing those lovely school days.... :(:(
तुम्हाला काय वाटतंय ? तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडतील...अभिजीत जोशी
अरे आम्हाला वाटायचं की पहिला दिवस शाळा स्वछ करायला लावतात म्हणून आम्ही दांडी मारायचो.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete