भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकत असताना लहानपणी पुस्तकात इंडिया हाउस बद्दल खूप वाचले होते...यावर्षी Onsite इंग्लंड मध्ये यायची संधी मिळाली...भारतीय स्वातंत्र्य आणि एकूणच क्रांतिकारी समाजाबद्दल मनात खूप कुतूहल होते...आणि ठरविले ..भारतीय स्वातंत्र्याबद्दल असणारी ठिकाणे न चुकता बघून यायची...तसे बघितले तर इंग्लंड मध्ये तुम्हाला भारताबद्दल खूप काही गोष्टी बघायला मिळतील..सर्वसाधारणपणे पर्यटक London Eye, Big Ben ,Madam Tussades Museum, Lords Cricket stadium,Westminster Palace इत्यादी ठिकाणे अगदी बघतातच...आणि लंडन मधील सध्याचे भारतीय पारपत्र (Passport) ऑफिस चे नाव पण इंडिया हाउस आहे..त्याचा आणि मी भेट दिलेल्या इंडिया हाउस चा तसा काही संबंध नाही....
लहानपणी इतिहासाचे पुस्तक वाचताना खूप मस्त वाटायचे...अभिनव भारत संघटना, पुण्यामध्ये केलेली विदेशी कपड्यांची होळी, त्यांचे इंग्लंड मध्ये वकिली सनद घेण्यासाठी येणे...इतर भारतीय क्रांतिकारी लोकांबरोबर मिसळणे...जोसेफ माझिनी या नेत्याबद्दल असणारा अभिमान..त्याचे चरित्र वाचून त्यावर पुस्तक लिहिणे... त्यातच बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान, गुप्तपणे माहिती छापून भारतात पाठविणे...ते देखील स्कॉटलंड यार्ड सारख्या करडी नजर ठेवून असलेल्या पोलिसांना चुकवून...या सगळ्याच गोष्टी अत्यंत प्रेरणादायी आहेत..मदनलाल धिंग्रा,लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा इत्यादी खूप खूप मोठी नावे या जागेशी निगडीत आहेत ....
परक्या देशात येऊन... त्यांच्याच विरोधात कारवाया करायला खूप मोठी हिम्मत लागते...मला अजूनही असे वाटते की त्यांच्या सारख्या कडव्या क्रांतिकारकाची भारतामध्ये अवहेलना झाली आणि दुर्दैवाने ते अजूनही उपेक्षित आहेत..आतापर्यंतच्या मी वाचलेल्या, ऐकलेल्या देशभक्तांमध्ये सावरकर सोडून बाकी कुठल्याही नेत्याने एवढे कष्टाचे दिवस काढले नसतील....भारतात परत येऊन देखील गांधी हत्ये नंतर त्यांना अटक केली गेली...या गोष्टी क्लेशदायी आहेत....त्यात नाही म्हणायला अंदमान निकोबारच्या विमानतळाला सावरकरांचे नाव दिलेले आहे... मुंबई मध्ये शिवाजी पार्क मध्ये त्यांचे घर आहे...मुंबई मधल्या रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे...असो...
सावरकरांची ग्रंथसंपदा ही अतिशय जहाल आणि खूप कडवी आहे...माझी जन्मठेप वाचताना काही काही पाने वाचताना अंगावर काटा येतो...स्वातंत्र्याची सहा सोनेरी पाने वाचताना पण हाच अनुभव येतो...हिंदू पद्पादशाही, १८५७ चा ब्रिटीश साम्राज्यावरचे बंड, सन्यस्त खड्ग, उ:शाप,उत्तरक्रिया इ. साहित्य संपदा वाचतानाच खूप भारावून जायला होते...
लंडन मध्ये येऊन त्यांनी १९०८ साली शिवजयंती आणि १९०९ मध्ये दसरा महोत्सव सुरु केला...काळाच्या पुढे विचार करणारा माणूस म्हणून त्यांचे वर्णन करता येईल...मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेतच..दूरदर्शन, निवृत्ती वेतन, महापौर इत्यादी शब्द ही देखील त्यांचेच...
जयोस्तुते, ने मजसी ने यांना कविता नाही म्हणवत...कदाचित या सगळ्या गोष्टींमुळेच मला सावरकर यांच्या व्यक्तिमत्वा विषयी प्रचंड आदर आहे...
यावर्षी स्वातंत्र्यदिनादिवशी मी लंडन मधेच होतो...ध्वज वंदन झाल्यानंतर मी इंडिया हाउस ला भेट द्यायची असे ठरविले...Highgate Hill जवळ कुठेतरी इंडिया हाउस आहे हे वाचले होते...हुडकत निघालो...गुगल वर शोधताना सावरकरांबद्दल खूप काही गोष्टी मिळाल्या....london remembers नावाची एक वेब साईट आहे..त्यावर सुदैवाने पोस्ट कोड मिळाला आणि नंतर गुगल नकाशाने ने काम खूपच सोपे करून टाकले...
जयोस्तुते, ने मजसी ने यांना कविता नाही म्हणवत...कदाचित या सगळ्या गोष्टींमुळेच मला सावरकर यांच्या व्यक्तिमत्वा विषयी प्रचंड आदर आहे...
यावर्षी स्वातंत्र्यदिनादिवशी मी लंडन मधेच होतो...ध्वज वंदन झाल्यानंतर मी इंडिया हाउस ला भेट द्यायची असे ठरविले...Highgate Hill जवळ कुठेतरी इंडिया हाउस आहे हे वाचले होते...हुडकत निघालो...गुगल वर शोधताना सावरकरांबद्दल खूप काही गोष्टी मिळाल्या....london remembers नावाची एक वेब साईट आहे..त्यावर सुदैवाने पोस्ट कोड मिळाला आणि नंतर गुगल नकाशाने ने काम खूपच सोपे करून टाकले...
मी साधारण दुपारी १२ वाजता आर्चवे स्थानकावर पोहोचलो....लंडन मध्ये प्रत्येक बस थांब्यावर, भुयारी रेल्वे स्थानकाबाहेर नकाशे लावलेले आहेत..त्याचा खूप फायदा होतो..बाहेर पडताच थोडा चढाचा रस्ता दिसला...तसाच सरळ निघालो...एक चर्च लागले पण क्रोमवेल अवेन्यू नावाची गल्ली दिसत नव्हती...थोडे इकडे तिकडे फिरून बघितले आणि एकदाची ती गल्ली सापडली...क्षणात हृदयाची धड धड वाढली...६५, क्रोमवेल अवेन्यू...इंडिया हाउस...सध्या हे घर कुणाच्या मालकीचे आहे ते माहित नाही...पण १ गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते...घरावर निळ्या रंगाची पाटी (The Blue Plaque) आहे. ८ जून १९८५ रोजी लॉर्ड फेनर ब्रोकवे यांनी या पाटीचे अनावरण केले ..त्यावर लिहिलेले आहे....ग्रेटर लंडन कौन्सिल, विनायक दामोदर सावरकर, १८८३-१९६६ , भारतीय देशभक्त आणि तत्वज्ञ इथे राहत होता.(१९०६ ते १९०९)...
घराच्या आजूबाजूने फिरताना मन खूपच भरून आले होते...खूप वर्षांपूर्वी ज्या जागेबद्दल वाचले होते ती प्रत्यक्षात समोर दिसत होती..त्या घराच्या समोर बसून जयोस्तुते... ऐकताना ज्या भावना मनात आल्या त्या शब्दबद्ध करणे खूपच अवघड आहे...भारताच्या इतिहासामध्ये या वास्तूचा खूप मोठा हात आहे...त्या वेळी इथे राहणाऱ्या सर्व देशभक्तांना मनातच साष्टांग नमस्कार घालून...एका वेगळ्याच प्रेरणेने मी त्या जागेचा निरोप घेतला..
----अभिजीत जोशी ---
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
----अभिजीत जोशी ---
तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
मस्त रे
ReplyDeleteछान लिहिले आहेस..