Friday, 29 April 2011

कांदे पोहे...the First meet...


 
त्याची अन तिची तशी पहिलीच भेट

नजरेला भिडते नजर थेट 
बोलायचं असतं खूप काही
शब्दांना धीरच फुटत नाही....

कुठूनतरी अचानक सुरुवात होते
रंग, सिनेमा, gossip ना उधाण येते
महत्वाचा विषय सोडून गाडी भरकटते, 
ज्येष्ठ मंडळीच्या दबावात वेळ उडून जाते

अचानक खाण्याचा पदार्थ पुढे येतो
चव न घेताच घास गिळला जातो

चहा देता घेता कपही थरथरतो 
मनाचा आवाज सुटकेसाठी धडपडतो 

हृदयाची धड धड ओठानाही जाणवते 
कांदे पोहे खाताना असे का होते?

उण्या पुऱ्या काही मिनटात 
खेळ आयुष्याचा रंगतो 
निर्णय क्षमता तपासताना 
विचारांचा जुगार होतो

लागला तर Jackpot, नाहीतर ठण ठणाट 
कपातले वादळ, येते अंगावर क्षणात

निरोप देताना, मन कोरडेच होते
नंतरच्या विश्लेषणाचे, भलतेच दडपण असते 

लग्नाचा FMEA* इतका सोपा असतो?
सर्व करूनही भविष्याचा भरवसा नसतो...

कोण कधी Click होईल, सांगता येत नाही...
अन आयुष्याची गाडी तोपर्यंत पुढे सरकत जाई....
------------------------------------------------------------   
अभिजीत जोशी 
१६ डिसेंबर २००९ 
तुमचे अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील....
( * FMEA - Failure Modes Effects Analysis - This is a Quality Assurance Term which deals with all Probable Risks and Mitigations... )


3 comments:

  1. Mast ahe ekdam...pan kay re tula asa anubhav ala ka? :P

    ReplyDelete
  2. Chan aahe.......tumhi kande-pohe kha...aani amhala ladu-pedhyanchi batami kalawa lawakarach!!! :)

    ReplyDelete
  3. Thanks a lot Nitin and Trupti... :) Keep reading..
    @ Nitin - Ajun anubhav nahi ala..its Learning from others... ;)

    ReplyDelete