Monday, 7 October 2024

वजन गाथा



डिसेंबर संपला, आला जानेवारी, 

नवीन संकल्पाना सुरुवात झाली बरी ।।१।।

कधी योग, कधी झुंबा,

कधी लिफ्टिंग, कधी थांबा,

लिहून झाले सर्व, कागदावरी, 

 नवीन संकल्पाना सुरुवात झाली बरी ।।२।।

दरवर्षीची यादी, या वर्षीही तशीच आहे, 

इतके सारे डाएट केले, चरबी मात्र तिथंच आहे,

नवीन बूट, नवीन कपडे,

व्यायाम कमी आणि ढीगभर नखरे ।।३।।

कधीतरी अचानक वजनकाटा दिसतो,

लटपटणाऱ्या पायांना जवळ बोलावतो,

म्हणतो कसा, जरा उभा रहा माझ्यावर,

बघू तरी, वजन कमी झाले का पसाभर? ।।४।। 

मनाला मात्र, सगळं खरं माहिती असतं,

डोळ्याला दिसत नसलं, तरी वजन मात्र तस्संच असतं,

मग आठवतात Gym साठी मोजलेले दाम,

काट्यावरचे वजन बघून अंगाला सुटतो घाम ।।५।।

मग फॅड येते, नवंनवीन डाएटचे, 

दीक्षित, दिवेकर पासून केटो फेटोचे, 

साखर नको, गुळच बरा, 

पोळी भात नको, भाकरीच कुस्करा ।।६।।

वजन असं सहज कमी होत नाही, 

त्याच्याही मागण्या असतात खूप काही,

त्याला हवा असतो तुमचा निश्चय आणि वेळ, 

हा तर आहे संयमाचा खेळ ।।७।।

-- अभिजीत जोशी,

७ ऑक्टोबर २०२४

 

No comments:

Post a Comment