Monday, 22 November 2021

बेनाम सी ख़्वाहिशें - भावानुवाद

मागच्या आठवड्यात युट्युब वर एक अतिशय सुंदर गाणे ऐकले. बघता बघता त्या गाण्याने रुंजी घातली. त्या गाण्याचा केलेला मराठीतील भावानुवाद. मूळ कवियित्री आहेत पिंकी पुनावाला. या गाण्याला संगीतबद्ध केले आहे पापोन या संगीतकाराने. या गाण्याची गायिका आहे अन्वेषा. गाणे जरूर  ऐका.

बेनाम सी ख़्वाहिशें, आवाज़ ना मिले
बंदिशें क्यूँ ख़्वाब पे..परवाज़ ना मिले
जाने है पर माने दिल ना तू ना मेरे लिए
बेबसी ये पुकार रही है आ साजन मेरे

चाँद तेरी रोशनी आफ़ताब से है मगर
चाह के भी ना मिले है दोनों की नज़र
आसमाँ ये मेरा जाने दोनों कब हैं मिले
दूरियाँ दिन रात की हैं, तय ना हो फासले

पतझड़ जाए, बरखा आए हो बहार
मौसम बदलते रहे
दिल के नगर जो बसी सर्द हवाएँ
क्यूँ ना जाएँ
आ जा आ भी जा मौसम कटे ना बिरहा के -- कवियित्री - पिंकी पुनावाला

मराठी भावानुवाद

निःशब्द भावनांना, शब्दांत मांडू कसे?
स्वप्नांच्या बंदिशींचे, गीत गाऊ कसे?

उमजले मला, आता वेगळा प्रवास,
साथ सोडू कशी, काय सांगू मनास?
अधीर मन आर्जवी, येशील ना सखे?
निःशब्द भावनांना, शब्दांत मांडू कसे?

चंद्रा तुझ्या प्रकाशाला, सूर्याचा वारसा,
एकमेकांच्या नजरेला, हवा कशाला आरसा?
दोघांच्या या भेटींचे, आकाशात ठसे,
अंतर हे दिवस-रात्रीचे, सरेल कसे?
निःशब्द भावनांना, शब्दांत मांडू कसे?

शिशिर सरता, वसंत येतो, बहराची नांदी,
दिसांमागून बदलत जाते, ऋतुचक्राची गादी,
मनी वसे, रुक्ष हवा, शुष्क वाळवंटी,
वियोगात सखया, गीत गाते विराणी,
ये, जिवलगा, लवकर ये,
सरता सरेना क्षण विरहाचे...

निःशब्द भावनांना, शब्दांत मांडू कसे?
स्वप्नांच्या बंदिशींचे, गीत गाऊ कसे?

- अभिजीत जोशी, २३ नोव्हेंबर २०२१

No comments:

Post a Comment