"नमस्कार मास्तर, कसे आहात?", माझ्या आजोबांना कुणीतरी वाटेत हाक मारली. आजोबांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खांदे वर उडवले, दोन्ही हात बाजूला घेत एकदम निवांत देहबोलीत, सदैव हसऱ्या चेहऱ्यात म्हणाले "समाधानी आहे".
मी कदाचित ४-५ वर्षांचा असेन.मला कळायला लागल्यापासून मी त्यांच्या सोबत बऱ्याचदा फिरत असायचो. माझी आणि आजोबांची भारी गट्टी असायची.
श्री. रघुनाथ वामन जोशी, रघु दादा, पोस्ट मास्तर, मास्तर, गुरुजी अशा वेगवेगळ्या नावांनी आजोबांना लोक हाक मारायचे. कामाच्या संदर्भात ते ज्या लोकांसोबत असतील त्या प्रमाणे त्यांचा उल्लेख व्हायचा. आमचे एकत्र कुटुंब. आजोबा, आजी, आई, बाबा, काका, काकू अशी बरीच मंडळी घरी. मी खूप नशीबवान समजतो की या सर्वांमुळे माझे बालपण खूप समृद्ध झाले.
आजोबा अत्यंत धार्मिक. रूढी, रीतिरिवाज, परंपरा पाळणारे. घरात देवघरात तर देव होतेच, पण भिंतीवर देखील जिकडे जागा मिळेल तिकडे बऱ्याच देव देवतांच्या तसबिरी होत्या. माझे पणजोबा व पणजी यांच्या देखील तसबिरी होत्या. रोज पहाटे लवकर उठून आजोबांची पूजेची तयारी सुरु व्हायची. आजोबांची पूजा साग्रसंगीत, बराच वेळ चालायची.
पहाटे लवकर उठून पाणी भरायचे. सकाळचा पहिला चहा (पहाटे ५.३० वाजता) झाला की, बागेतील फुले काढायची. स्वस्तिक, जास्वन्दी, मोगरा, अबोली, तगर, गुलाब, तुळस,दुर्वा इत्यादी झाडांची फुले/पाने काढून झाली की अंघोळ. मग दुसऱ्या चहाची वेळ. आजोबा पूजेला बसायचे. प्रत्येक देवाला नीट पुसून, निर्माल्य काढून, ज्याच्या त्याच्या वाराप्रमाणे अग्रक्रम असायचा. आजोबांची व आजीची पूजेची तयारी अन एकंदरीतच सर्व प्रकार अत्यंत नीटनेटका अन सुंदर असायचा. तिकडे गडबड झालेली त्यांना अजिबात चालायची नाही.
पूजा आटोपली की आजोबा बाहेर पडायचे. गावातील दत्त, गणपती, शंकर, विष्णू, मारुती, शाकंभरी, दर्गा, अंबाबाई, कल्लेश्वर , यल्लमा या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन यायचे. कोणताही देव त्यांना वर्ज्य नव्हता. मोहरमच्या पंजे नाचवताना देखील ते अगदी भक्ती भावाने त्याला नमस्कार करायचे. सर्व ठिकाणी चालत हिंडायचे. वयाच्या ८० वर्षापर्यंत नरसोबाच्या वाडीला चालत जाऊन यायचे. नशीब त्या वेळी "step counter devices" नव्हते. नाहीतर त्याचे सगळे विक्रम आजोबानी नक्कीच मोडले असते.
आजोबा शिकायला औंध च्या राजाच्या शाळेत होते. १०-१२ वर्षाचे असताना रोज १००० सूर्य नमस्कार घालायचे असे आजोबा सांगायचे. कदाचित त्याच्यामुळेच आजोबांच्या पोटावर चरबी मी कधीच बघितली नाही. स्वतःच्या तब्येतीविषयी सदैव जागरूक असायचे. हॉटेलातील चहा सोडला तर बाकी कोणतेही पदार्थ खाताना मी बघितले नाही. आमच्या घरातील सगळ्यात तंदुरुस्त व्यक्तिमत्व होते. त्यांच्या याच गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. मला देखील तब्येत अशीच ठणठणीत ठेवायची आहे.
आजी-आजोबांसोबाबत मी बराच हिंडायचो. दोघेही खूप साधे आणि समाधानी आयुष्य जगले. मिळेल त्या पैशात समाधानी राहण्याची वृत्ती त्यांच्या अंगात भिनलेली होती. आजोबा सदैव देवांच्या गोष्टी सांगायचे. आई वडिलांना सुखी ठेव, आयुष्यात तुला कधीही काही कमी पडणार नाही. आपले काम करत राहा, तुझे कामच तुझी ओळख बनेल.
पोस्टमास्तर म्हणून त्यांनी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काम केले. आजोबांचा स्वभाव तसा बोलघेवडा. कित्येक लोक त्यांना भेटायचे. त्यांची विनोद बुद्धी खूप छान होती. त्यांना पत्र लिहायला आवडायचे. कुरुंदवाड सोडून कुठे फिरायला जरी गेले तरी साधारण दर १५ दिवसांनी खुशालीचे पत्र यायचे. पोस्ट खात्यावर त्यांची भक्ती होती. मी माझ्या कामाच्या निमित्ताने विदेशात गेलो होतो. तिकडून त्यांना फोन जरी केला तरी सांगायचे, अरे पत्र लिहीत जा. पत्र लिहिण्यात अन वाचण्यात जी मजा आहे ती फोनवर बोलण्यात येत नाही. पत्र परत परत वाचता येते, आपल्या जवळच्या माणसाची आठवण सदैव सोबत ठेवता येते.
कामाची सचोटी अन स्वयंशिस्त हे दोन्ही गुण आजोबांच्या अंगात भिनलेले होते. मी माझ्या पूर्ण आयुष्यात त्यांना कधीही चिडलेले, रागावलेले बघितले नाही. आजीच्या तब्येतीची काळजी देखील ते खूप छान घ्यायचे. तिला वेळच्या वेळी गोळ्या देणे, सोबत पाणी देणे, सकाळचा चहा करणे, जमेल तशी तिला तिच्या कामात मदत करणे इत्यादी. त्या दोघांचे सहजीवन देखील खूप अनुकरणीय आहे.
बरोबर १ वर्षापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली. डोळ्यासमोरून असंख्य आठवणींचा पट उलगडत गेला. माझ्यासाठी ते निव्वळ आजोबाच नव्हे तर देवासमान होते. आयुष्याचा खूप मोठा काळ, आणि अत्यंत सुंदर वेळ त्यांच्या सोबत राहिलो. माझे बालपण खूप समृद्ध आणि संस्कारक्षम झाले.
मला खात्री आहे, इहलोकात देवाने जरी त्यांना विचारले, "मास्तर कसे आहात?" आजोबा हसऱ्या चेहऱ्याने, त्यांच्या नेहमीच्या देहबोलीत "अत्यंत समाधानी आहे" असेच म्हणतील.

No comments:
Post a Comment