गेले बरेच दिवस धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव या बद्दल बऱ्याच चर्चा ऐकतो आहे. लेख वाचतो आहे. मला प्रश्न पडला आहे धर्म खरा की कर्म खरे?
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे...
कदाचित साने गुरुजींच्या या ओळी संस्कारक्षम वयात अनुभवल्या नसाव्यात म्हणून तर धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण करणे काश्मीर मध्ये सहज शक्य आहे. कुणी तरुण उठतो. सामाजिक माध्यमातून द्वेष, देश विघातक लिखाण करतो. बंदुका घेऊन मिरवतो अन तो चकमकीत मारला गेला की काही अति सुजाण पत्रकार भलते सलते चिव-चिवाट करतात. कुठलाही विधीनिषेध न बाळगता पराचा कावळा करून फक्त संभ्रमित करायचे काम करतात. मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. त्यावरील उपाय कसे करता येतील याचा कोणीच उहापोह करत नाही.
काही दिवसांपूर्वीच जनरल के. व्ही. कृष्णराव यांचे आत्मचरित्र वाचले. "कथा एक सरसेनापतीची". विदुला देशपांडे यांनी अत्यंत सुंदर अनुवाद केला आहे. या माणसाने अविरत मेहनत घेऊन पूर्वोत्तर राज्ये आणि काश्मीर मध्ये सुरू असलेल्या दहशतवादावर कसे नियंत्रण ठेवले हे या पुस्तकातून सांगून अतिशय सत्य चित्र उभे केले आहे.या दहशतवादावर कशी मात करता येईल याचे उपाय देखील त्यांनी अमलात आणले आहेत. अत्यंत स्पष्ट शब्दात ते म्हणतात, आपले शेजारी, हा प्रश्न कसा धगधगत राहील याची काळजी घेत असतात.
भारतात असे बरेच तरुण आहेत, ज्यांना संधी नाही, दुष्काळ, शिक्षण आणि परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून काय देश विघातक कृत्यांत सामील व्हायचे? संस्कारक्षम वयात, पालकांनी नीट मार्गदर्शन केले असते तर ही वेळ आलीच नसती. तरुण रक्ताला सद्सद्विवेक सांगायलाच हवा. ही सद्सद्विवेक दृष्टी देण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षक दोघांवरही आहे. त्यासाठी देशाला दोष न देता आपण स्वतः काय करतो हे बघणे तितकेच महत्वाचे.
देश महत्वाचा, बाकी सर्व नंतर...
विवेकच नाही, विचार खुंटला,
माथी भडकवी, लबाड कुठला,
तारुण्याचे वय कोवळे, मेंदूत तो कूविचार घूसळे
उन्मादाच्या बेभान क्षणी, मानव ते राक्षस बनले,
अविवेकी कर्माने, निष्पाप जीवांचे जीवन संपले.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजी सांगून गेले,
माणसातील देव पहा, गाडगे बाबा बोलून राहिले
कधी समाज, कधी धर्म, मागे उरते आपले कर्म
कर्माला मिळावी, विधायकतेची साथ
विवेके तोलू, विचारांची वाट...
- अभिजीत जोशी
१६ जुलै २०१६

No comments:
Post a Comment